१ जुलै, महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे जनक, महानायक वसंतरावजी नाईक यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या महानायकाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशपातळीवर कृषीक्षेत्रात केलेल्या अत्यंत भरीव कार्यामुळे त्यांचे नाव कृषीक्षेत्राशी कायमचे जोडले गेले आहे. नाईक साहेबांनी त्यांचे उभे आयुष्य कृषी क्षेत्राला व शेतक:यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी खर्ची केले. शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता व त्यांची पूर्तता करण्यासाठी ते अहोरात्र राबराब राबत होते.
व्यासपीठ कोणतेही असो नाईक साहेब भारतीय शेती व शेतक:यांविषयी अत्यंत तळमळीने व अभ्यासपूर्ण बोलत असत. राष्ट्रीय पातळीवरील कृषी मंत्र्यांच्या व मुख्यमंत्र्यांच्या परिषदांमध्ये तर त्यांचे विचार किती प्रभावी असायचे, याबाबत भारत सरकारचे तत्कालीन कृषीमंत्री मा.श्री.अण्णासाहेब शिंदे म्हणतात की, ''भारत सरकारच्या अन्न व शेती मंत्रालयात मी १९६२ ते १९७७ पर्यंत काम केले. त्या मंत्रालयाच्या वतीने भारतीय पातळीवर वर्षातून एक-दोन वेळा कधीकधी तीन-चार वेळाही वरील विषयाची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या परिषदा होत असत. भारत सरकारचा व कृषि मंत्रालयाचा प्रतिनिधी म्हणून मी या सर्व परिषदास हजर असे. संपूर्ण देशातील बहुतेक सर्व मुख्यमंत्री या परिषदांना हजर असायचे.
गुणवत्तेत एकापेक्षा दुसरा श्रेष्ठ असे मुख्यमंत्री होते. अशा परिषदेत सर्वात उत्कृष्ट आणि डोळ्यात भरेल अशी कामगिरी वसंतरावजी नाईकांची होत असे. वसंतराव नाईकांचे भाषण संपले की, वसंतरावांचे अभिनंदन करण्याची अहम ओढ मुख्यमंत्र्यांमध्ये लागत असे. अनेक मुख्यमंत्री स्वत:ची जागा सोडून वसंतरावांच्याकडे जात आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांचे अभिनंदन करीत. कुणी त्यांना कडाडून मिठी मारीत, तसेच अनेक मुख्यमंत्री आपल्या औपचारिक भाषणात राष्ट्रीय भूमिका व सर्वांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडले म्हणून वसंतरावजींना धन्यवाद देत असत. इतर मुख्यमंत्री प्रामुख्याने स्वत:च्या प्रांतातील प्रश्न मांडत असत. वसंतरावजी महाराष्ट्राचे प्रश्न प्रभावीपणे मांडीतच; परंतु राष्ट्रीय प्रश्नावरही त्यांचा भर असे, त्यांच्याइतकी तेजस्वीपणे व प्रखरपणे भारतीय शेतक:यांची बाजू दुसरे कोणीही मांडू शकत नव्हते.
मी महाराष्ट्राचा असल्याने व वसंतराव नाईक हेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच सर्वत्र अभिनंदन होताना पाहून मलाही खूप आनंद व्हायचा व माझी छाती भरून येत असे. वसंतरावजींसारखा समर्थ आणि कर्तबगार मुख्यमंत्री आम्हाला लाभलेला आहे व ते आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत, याचा सार्थ अभिमान वाटत असे, वसंतरावजी नाईक यांच्यासारखा सुपूत्र महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला होता, हे महाराष्ट्राचे, आमचे सर्वांचे सद्भाग्य समजले पाहिजे.

नाईक साहेब १९६३ साली मुख्यमंत्री झालेत. हा काळ देशातील शेतीच्या आघाडीवरील अरिष्ठांचा काळ होता. भारताचा अमेरिकेबरोबर सवलतीच्या अटीवर अन्नधान्य घेण्याचा पी.एल.-४८० हा करार झालेला होता. अन्नधान्याचा देशात एवढा तुटवडा होता की ब:याच वेळा अन्नधान्य बोटीतून उतरवून घेतल्याबरोबर सरळ रेशन दुकानात पाठवावे लागत होते. परदेशातून आयात केलेल्या धान्यांपैकी ३० ते ३५ टक्के धान्य केंद्र सरकारला महाराष्ट्राला द्यावे लागत होते. ही महाराष्ट्राच्या दृष्टिनेही नामुष्कीची बाब होती. याची नाईकसाहेबांना जाणीव होती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापासूनच देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले पाहिजे, असे ठराव निरनिराळ्या पातळीवर केले जात. तथापि, भारतातील अन्न प्रश्न सुटण्याच्या दृष्टिने विशेष प्रगती होऊ शकली नव्हती.
१९३५ व १९६६ साली तर भारतातील अनेक प्रांतात मोठा दुष्काळ पडला आणि भीतीचे वातावरण देशात तयार झाले होते. बिहार, केरळ, पश्चिम बंगाल, आदी राज्यात अन्नधान्य आघाडीवर कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते. नाईकसाहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अन्नधान्याचे आव्हान स्वीकारले व राज्यभर तुफानी दौरे करुन शेतक:यांना आधुनिक पद्धतीने शेती करुन संकरित बियाणांचाच जास्तीत जास्त पेरा करुन राज्याला व पर्यायाने देशाला अन्नधान्याच्या गंभीर संकटातून बाहेर काढण्याचे कळकळीचे आवाहन केले. व्यासपीठ कोणतेही असो, नाईकसाहेब शेती, संकरित बियाणे व शेतकरी यांचेवर जास्तीत जास्त बोलत असत. संकरित बियाण्यांचा वापर करायचे शेतक:यांना केवळ आवाहनच त्यांनी केले नाही, तर त्यांच्या स्वत:च्या गहुली व शेलू येथील शेतीत संकरित बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड त्यांनी केली.
त्यांच्या या धाडसी धोरणामुळे संकरित बियाण्यांचा प्रचार तडकाफ डकी झाला आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील चित्र बदलले. सुरुवातीला शंभर एकर जमीन संकरित बियाण्यांच्या लागवडीसाठी होती ती ५०००० एकरांच्या पुढे गेली व हे प्रमाण सतत वाढत होते. नाईकसाहेबांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश येत होते. याचवेळी अमेरिकेने पी.एल.-४८० करारांतर्गत कुरापती काढून अन्नधान्याचे जहाज रोखून धरल्याबरोबर नाईकसाहेबांचा प्रखर राष्ट्रीय बाणा जागृत झाला व ते पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर गरजले, 'महाराष्ट्र जर या दोन वर्षात अन्नधान्य उत्पादनांत स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्याÓ, त्यांचे हे आवाहन स्वीकारून सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली. या यंत्रणेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी चोखपणे बजावली, महाराष्ट्र व पुढे देशसुद्धा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. विदेशातील निकृष्ट दर्जाच्या धान्याची आयात करणे बंद झाले.

नाईकसाहेबांनी संकरित बियाणांच्या प्रचार व प्रसारांच्या माध्यमातून अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेबाबत केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबाबत भारताचे माजी कृषी मंत्री मा. अण्णासाहेब शिंदे पुढे म्हणतात, 'वसंतरावजींची भाषणे, त्या काळात त्यांनी शेतक:यांना केलेले मार्गदर्शन, शेतक:यांत जागृती व्हावी म्हणून केलेले प्रयत्न, हा एक मोठा इतिहास व स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.Ó वसंतरावजींनी शेतीचे नवीन कार्यक्रम राबविण्यासाठी भारत सरकारला व कृषी मंत्रालयाला जी मदत केली, त्याचा राष्ट्राला खूप फ ायदा झाला. जो भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत सर्वस्वी परावलंबी होता तो स्वावलंबी झाला, ही परिस्थिती त्यांच्या हयातीतच आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाच निर्माण झाली, हे विशेष महत्त्वाचे आहे. म्हणूनच बांगलादेशाच्या युद्धाच्या वेळेस म्हणजे १९७१-७२ साली बांगलादेशाच्या लक्षावधी निर्वासितांना भारत सरकार अन्न पुरवू शकले.
भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनू शकेल असा देशातील अनेकांना आणि भारताच्या मित्रांनासुद्धा विश्वास वाटत नव्हता. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला, ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या आधुनिकीकरणाला फार मोठे पाठबळ मिळाले, हे विसरून चालणार नाही. बलाढ्य शक्ती असलेल्या रशियाला अथवा चीनलासुद्धा त्या काळात जे शक्य झाले नाही, ते भारताने करुन दाखविले. त्यामुळे भारत सर्वत्र कौतुकाचा विषय बनला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जागतिक अन्न व शेती संघटनेच्या वतीने व डॉ.बोरलॉग यांच्या मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय गहू व मकाच्या संशोधन केंद्रातर्फे आणि अनेक राष्ट्राच्या वतीने जाहीर गौरव केला गेला. या गौरवात वसंतरावजींचा मोठा वाटा होता. आपण या ऐतिहासिक घटनांच्या अगदी जवळ आहोत. वसंतरावजींनी हरितक्रांतीचे 'महाराष्ट्रात व भारतात पाया घालण्यासाठी जे अविश्रांत श्रम केले व महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली त्यांच्या ह्या कार्याचे योग्य मूल्यमापन होऊन हरितक्रांतीचे शिल्पकार म्हणून राष्ट्राने त्यांचा उचित गौरव करावा, असे मला नम्रपणे सर्वांना सांगावेसे वाटते.

१९७२ च्या दुष्काळाचा सामना करताना नाईक साहेबांनी जे परिश्रम घेतले, त्याला तोड नाही. दुष्काळी कामाची पाहणी करताना कित्येक किलोमिटरपर्यंत रखरखत्या उन्हात ते पायी चालत असत. त्यावेळेच्या दुष्काळात पिण्याच्या पाण्यापेक्षा अन्नधान्याच्या कमतरतेने भीषण स्वरूप धारण केले होते. भुकबळी होऊ नये म्हणून नाईक साहेबांनी प्रशासनाला व स्थानिक लोकप्रतिनिधींना सक्त आदेश दिलेत की, भूकबळी होऊ नये, ही केवळ सरकारची जबाबदारी न समजता त्या गावातील समाजाचीसुद्धा ती नैतिक जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून पोलीस पाटील व सरपंच यांना गावातील भूकबळींसाठी जबाबदार धरले जाईल, असा फतवा त्यांनी काढला होता. शासकीय मदत मिळण्यास वेळ लागते, या दरम्यानचा खर्च गावाने केला तर शासनाकडून ताबडतोब त्याची भरपाई केली जाईल, असेही आदेश त्यांच्या कारकिर्दीत काढण्यात आले होते.
१९७२-७३ च्या दुष्काळामधूनच क्रांतीकारी अशा रोजगार हमी योजनेने महाराष्ट्रात आकार घेतला. कार्ल माक्र्सच्या श्रमशक्तीविषयक योजनेसारखी ही योजना म्हणजे वि.स.पागे साहेब व नाईकसाहेब यांनी महाराष्ट्राला दिलेली फार मोठी देणगी होय. या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय नाईकसाहेबांनाच जाते. त्यातही रोजगाराची हमी देणारी एवढी मोठी व क्रांतीकारी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशपातळीवरचे पहिले राज्य होते. या योजनेबाबत केंद्र पातळीवरसुद्धा प्रसंशा करण्यात आली व इतर राज्यांनीसुद्धा ही योजना आपापल्या राज्यात सुरू करावी, अशा सूचना इंदिराजींनी इतर राज्याना केल्या होत्या. आज तर महाराष्ट्राची ही योजना केंद्र सरकारने जशीच्या तशी राष्ट्रीय स्तरावर 'मनरेगाÓ या नावाने सुरू केली आहे.
यामागे महाराष्ट्राचे व ही योजना सुरू करणा:या ह्या महान नेत्याचे कर्तृत्व आहे. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीत असतांनाही एवढी मोठी कोट्यवधी रुपयांची योजना कशी सुरू करायची असा प्रश्न पडला असतांनाही तत्कालीन विरोधी पक्ष नेते मा. कृष्णरावजी धुळूप व इतर विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारला करवाढ करायचे सुचवून जगातील सांसदीय लोकशाहीच्या इतिहासात एका नवीन घटनेची नोंद झाली. त्यामुळे ही एवढी मोठी योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात तत्कालीन विरोधी पक्षाचे व श्री कृष्णरावजी धुळूप यांचेसुद्धा बहुमोल योगदान होते. या योजनेचीही चर्चा केवळ राष्ट्रीय पातळीवरच होत नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरील जागतिक बँक, नाणे निधी व संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोजगार संधीविषयक विभागाकडूनसुद्धा या योजनेची विशेष दखल घेण्यात येत आहे. यातच या महानायकांचे महानत्व सामावलेले आहे. नाईक साहेबांनी महाराष्ट्रातील शेती व शेतकरी यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत, ह्या प्रयत्नांतूनच महाराष्ट्रातील ज्वारी खरेदी योजना, कापूस एकाधिकार योजना, वसंत बांध बंधा:याची निर्मिती, तब्बल चार कृषी विद्यापीठाची निर्मिती, अनेक सहकारी सुतगिरण्या व सहकारी साखर कारण्याची निर्मिती, सहकारी दुग्ध विकास संघाची निर्मिती, यासारख्या कृषी क्षेत्राशी व शेतक:यांशी निगडीत अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्यात.
नाईक साहेबांचे शेती आणि शेतक:यांवर निस्सीम प्रेम होते. ते त्यांनी स्वत: पुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील अनेक पुढा:यांना त्यांनी आग्रहाने शेती घ्यायला लावली. त्यांच्या शेतीवर ते स्वत: चक्कर मारायचे, त्याद्वारे त्यांनी अनेकांच्या मनात शेतीबद्दल प्रेमभावना निर्माण केली. शेतीवरील प्रेमाबाबत अण्णासाहेब शिंदे म्हणतात की, स्वातंत्र्योत्तर काळात भारताने प्रथम श्रेणीचे मुख्यमंत्री निरनिराळ्या राज्यांना दिले. या प्रथम श्रेणीच्या मुख्यमंत्र्यांची नावे भारताच्या व त्या प्रदेशाच्या इतिहासात अजरामर झाली आहेत. पंजाबचे श्री कैरो, तामिळनाडूचे (त्या वेळचा मद्रास) प्रथम श्री. राजगोपालचारी व नंतर श्री कामराज, बंगालचे डॉ.बी.सी रॉय, महाराष्ट्राचे श्री. यशवंतराव चव्हाण व श्री. वसंतरावजी नाईक हे मुख्यमंत्री त्यापैकीच होते. डॉ.बी.सी.रॉय यांना तर खूपच प्रतिष्ठा होती. डॉ.बी.सी.रॉय जर दिल्लीत आले तर पंतप्रधान पंडित नेहरू त्यांच्या स्वागताला विमानतळावर अथवा रेल्वे स्टेशनवर हजर असत, तथापि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांसंबंधीची जाणीव, सामाजिक गुंतागुंत, शेती व शेतकरी यांचे प्रश्न आणि शेती उत्पादनाचे कार्यक्रम याबाबत श्री.यशवंतराजी चव्हाण आणि वसंतरावजी नाईक या दोघांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून डॉ.बी.सी.रॉय यांच्यापेक्षा कितीतरी अधिक व मोलाची भर घातलेली आहे. केवळ शेती प्रश्नांपुरताच विचार केला तर वसंतरावजीची कुणीही बरोबरी करू शकणार नाही. 'तुज सम तूचÓ एवढेच वसंतरावजींच्या बाबतीत म्हणावेसे वाटते.
या महानायकांनी शेती व शेतक:यांवर जसे निस्सिम प्रेम केले तसेच त्यांनी त्यांच्या पक्षातील व विरोधी पक्षातील नेत्यांचाही सदैव आदर केला, म्हणूनच त्यांना नानासाहेब गोरे यांनी श्रेष्ठ राजकारणी, बॅ. शेषराव वानखेडे यांनी मित्र जोडणारा नेता, जवाहरलाल दर्डा यांनी सच्चा मित्र, रा.सू.गवई यांनी राजा मनाचा दिलदार प्रशासक, यशवंतराव मोहिते यांनी शेतक:यांचे कैवारी, बापुसाहेब काळदाते यांनी विरोधकांची प्रतिष्ठा जोपासणारा नेता, कृष्णराव धुळूप यांनी हेवा वाटावा असा नेता, वसंतराव साठे यांनी यशस्वी मुख्यमंत्री, लोकनायक बापूजी अणे यांनी कृषी उत्पादन वृद्धीचा निरंतर ध्यास घेणारा असामान्य नेता, एस.एम.जोशी यांनी समाजवादाची बीजे रुजविणारा द्रष्टा नेता, मृणाल गोरे यांनी विरोधकांशीही जिव्हाळ्याने वागणारा नेता, बाळासाहेब भारदे यांनी नव महाराष्ट्राचा शिल्पकार, वि.स.पागे यांनी विकासाचा द्रष्टा पुरुष, जयंतराव टिळकांनी सुसंस्कृत प्रसन्न नेता, नरुभाऊ लिमये यांनी लोकशाहीचा नि:स्सीम उपासक, अण्णासाहेब शिंदे यांनी महाराष्ट्राचा सुपूत्र, यशवंतरावजी चव्हाण यांनी न्यायी मणुष्य, श्रीमती वत्सलाताई नाईक यांनी स्वत: आनंदी राहून इतरांना सदैव आनंदीत ठेवणारा भावनाप्रधान कुटुंबवत्सल नेता तर शरद पवार साहेबांनी शेती व शेतकरी प्रेम युवकात जागविणारा नेता या शब्दात वरील थोरांनी नाईक साहेबांच्या व्यक्तीमत्त्वाचे वर्णन केले आहे. नाईक साहेबांची जन्मशताब्दी १ जुलै २०१३ ते १ जुलै २०१४ ह्या वर्षात राज्यभर शासकीय स्तरावर व वेगवेगळ्या सामाजिक स्तरावर साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त ह्या महानायकास विनम्र अभिवादन!
0 Comments