सुरेश येरमुले जोपासतो मायेचा ओलावा
... चमकते हैं वही तारे जो जलना जानते हैं,
फतह करते हैं हर मंजिल वो अपने हौसलों से
ज़माने में जो गिरकर भी संभालना जानते हैं।
साहेब...! सुख,समृद्धी,समाधान,धनसंपदा,
दिर्घायुष्य,आरोग्य तुम्हाला लाभो! वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा...!
शून्यातून विशाल अवकाशाकडे झेपावणारा खडतर संघर्षमय प्रवासाचा आदिवासी तरुण सुरेश निंबाजी येरमुले युवकांच्यासाठी ठरतोय प्रेरणादायी.झोपडीत राहणाऱ्या सुरेश येरमुले या तरुणानी जिद्द,मेहनत अन् प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत,थेट ‘लहरोंसे डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती’ .....
या काव्यपक्ती तंतोतत खऱ्या करून दाखविल्या आहेत. घरातील अठराविश्व दारिद्र्यापुढे न झुकता पोलिस विभागात शासकीय सेवेत दाखल होण्याची किमया केली आहे. हा पल्ला गाठताना वाटेत अनेक ठिकाणी संघर्षांचे काटे टोचले पण त्यांनी मैदान न सोडता ध्येयपूर्ती केल्याने समाजात आज कौतुकास्पद आहेत.आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक आदिवासी तरुण इतर समाजाच्या तरुणांच्या बरोबरीने उज्वल कामगिरी करतांना दिसतात.मग ते क्षेत्र कोणतेही असो.अतिशय प्रतिकूल परिस्थिती असुन सुद्धा स्व:कर्तुत्वावर पोलीस विभागात भरती होऊन जी उंची प्राप्त केली आहे ती खरचं अविश्वसनीय आहे...
कधीकधी काही जणांच्या आयुष्यात असं काही वादळ घोंघावतं की, त्यातून आपली नौका कशी पार होणार, याचा काहीच अंदाज येत नसतो. पण बुडत्याला एका काडीचा आधार, तसं काहीसं घडतं आणि न डगमगता या बेफाम लाटांवरही तो टिकाव धरतो.निर्धाराने तेवत राहिलेल्या अशा तुफानातल्या दिव्यासारख सुरेश येरमुले यांचे आयुष्य मी जवळून पाहिलेलं आहे.संघर्ष केला तर यश मिळतं.खचू नका.लढत रहा.हे सर्व करुन दाखवलं आहे बुलढाणा जिल्हामधील मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथील ध्येयवादी तरुणाने,सुरेश निंबाजी येरमुले ही जिद्द सुर्यकिरणासारखी होती.वाकणे त्याला मान्यच नव्हते.आपल्या भरारीचा शेवटचा थांबा त्याला मान्य नव्हता.अडचणी होत्याच.नकार होतेच.अवरोध होतेच.पण या सर्वच पान्हाचोर परिस्थितीला वाकविणारी जिद्दही होती.या जिद्दीने सतत पुढल्या थांब्याचा ध्यास घेतला.प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या या "कर्तुत्वशाली योद्धा" चा मला मोठा गौरव वाटतो.
आपण सुर्यपुत्र आहोत आपण अंधाराशी युद्ध करु शकतो.आपल्या जीवनाला आपण युद्ध हे शीर्षक देऊ शकतो.आपण आपल्या जन्माचे सोने करु शकतो.झगमगत्या नक्षत्राची नेत्रदीपकता आपण आपल्या आयुष्याला देऊ शकतो हे परंपरांच्या अंधारांनी तुडवलेल्या खेड्यांमधील वाशिम जिल्ह्यात पोलीस विभागात कार्यरत असलेल्या वर्दीती दडलेल्या कवी मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! यशप्राप्तीसाठी मनात आग लागली.मनात जिद्दीच्या ज्वाला भडकत होत्या. तो पर्यंत जीवनात यश मिळत नाही.तोपर्यत प्रवाशाच्या वाटेवर निघतांना अनेक अडचणी येतात, खाच खळगे असतात. दगड, माती, गोटे आणि डोंगरही असतात.
या सर्वावर जो मात करत अखेर यशाचं शिखर गाठतोचं, यशाचे शिखर गाठतांना कधीच शॉर्टकट शोधला नसून,खडतर प्रवासाच्या संघर्षातून यश मिळवत जिवनात परिवर्तन घडवले,त्यामुळे आजच्या तरुणांना सुरेश येरमुले प्रेरणादायक ठरतायेतं.घरात अठराविश्व दारिद्र्य दोन वेळेचे पोटभर जेवण मिळण्याचीही शाश्वती नव्हती.शिक्षणाची कोणतीही घरात पार्श्वभूमी नाही.पोटाची खळगी भरण्यासाठी आजोबा आणि वडीलाची वनवन गावोगाव भटकंती होती,अंगावर कपडा नाही,पायात चपल नाही,डोक्यावर छत नाही तरी सुद्धा संसाराचा गाडा हाकत हाकत ऊन पावसाच्या झळा सोसत सोसत वडील निंबजी यरमुले मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे आपल्या झोपडीचा निवारा उभा केला.घरी कोणतीही शेतजमीन नाही म्हणून अहोरात्र श्रीमंत लोकांच्या शेतात काबडकष्ट करुन संसाराचा गाडा चालवायचा.अशा कठिन बिकट परिस्थितीत दि.१५ फेब्रुवारी १९८२ रोजी मातोश्री मंदोदरी निंबाजी येरमुले या आदिवासी अंधारलेल्या कुटूंबात दीपरत्न सुरेश येरमुलेचा जन्म झाला.
पाचविलाच पुंजलेले दारिद्रय असल्यामुळे अल्पशिक्षित कुटूंबातून सुरेश येरमुलेच्या मनात शिक्षणाची ओढ निर्माण झाली.पण दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याने आईचा फाटका पदर धरुन सुरेश येरमुले शेतात मोल मजूरी करत होते.कुटूंब संसाराला हातभार लागवा म्हणून हाताला मिळेल ते काम करायचे आणि आपल्या आई वडीलाना खाण्यापिण्याची चणचण भासू नये म्हणून मदत करायची त्यामुळे कसली शाळा!पण उराशी स्वप्नं बाळगणाऱ्या सुरेश येरमुले स्वत:च्या पायावर उभे राहुन प्राथमिक शिक्षणाचे धडे उमरा देशमुख गावातच चौथी पर्यत गिरवले.त्यानंतर पाच किलोमीटर अणवाणी पायाने चालत चालत लोणीगवळीच्या हायस्कूल मध्ये बारावीपर्यत शिक्षणाचे धडे गिरवले.हातात पाटी नाही, पुस्तक नाही,खिशाला पेन नाही,पण अंधारलेल्या कुटूंबात प्रकाश करण्यासाठी शिक्षक फळ्यावर काय लिहतात त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन ते अक्षर आपल्या मस्तकात आत्मसात करुन पदवीपर्यंतचे शिक्षण खामगांवला पुर्ण केले.
सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी आणि सर्वोच्च शिखरावर पोहचण्यासाठी त्या गुणवत्तेचा शोध घेऊन अथकपणे वाटचाल केली आणि कर्तुत्वाच्या शिखराला साद घातली.आव्हानांना सामोरे जाऊनच आपली मुद्रा उमटवता येते हे सिद्ध करून दाखविले आणि मेहकर तालुक्यातील विश्वी येथील विठ्ठल रुक्माई विद्यालयात विद्यार्थी घडविण्याचे काम अडीच वर्षे सहायक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचे धडे गिरवून घेतले."शिक्षण हे वाघणीच दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही" असे विश्वरत्न महामानव युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते.त्याच अनमोल विचारांचा वसा अंगीकारुन या ध्येयवेड्या सुरेश येरमुले नी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले खरे पण, डोनेशन चा प्रश्न ऐरणीवर आल्याने व घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शाळेवर डोनेशन भरण्यासाठी जवळ पैसा नव्हता.अशा कठीण परिस्थितीत समाजात कोणताही मित्र किंवा नातेवाईक मायेचा ओलावा देऊन एखाद्या पाठीराखा उभा राहिल अशी मनात भाबडी अपेक्षा असली तरी वेळ आल्यावर मदतीला कोणीच धावून येत नसतो, त्यामुळे डोनेशन अभावी शिक्षकांची नोकरी सोडून दिली.
त्यामुळे सुरेश येरमुले पुन्हा आयुष्याच्या खडतर वळणावर येऊन उभा राहिला.देवावरील आणि भाग्यावरील विश्वास नाहीसा झाला. पण जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली.पहिऱ्या पानावर 'जन्म' लिहला.आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहला.पण जे दुसरे पान कोरे ठेवले ते मानवाच्या हातात आहे. मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते या दुसऱ्या पानालाच "जीवन" म्हणतात हा सिद्धांत आचार्य विनोबा भावे यांनी मांडला होता तो सुरेश येरमुलेच्या वाचण्यात आला त्यामुळे आर्थिक विवंचनेतून दिशाहीन वाटचालीपेक्षा प्रंचड परिश्रमाच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर गावात पानपट्टी व्यवसाय सुरू केला सोबतच खेड्यापाड्यात जाऊन कपडे साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला त्यामुळे सामान्यातूनच असामान्यत्वाचा जन्म होतो हे सुरेश येरमुलेच्या लक्षात आले होते म्हणून काही व्यक्ती संघर्ष करण्यासाठीच जन्म घेतात की काय? असा प्रश्न सुरेश येरमुलेला सतावत होता म्हणून जिद्द आणि चिकाटी परिश्रम करूनच यशाला गवसणी घालतायेते हे विचार मनात रुजले आणि सुरेश येरमुले पुन्हा दिवसभर आपला व्यवसाय करुन सकाळी चार वाजता बेफाम रस्त्यावर धावत होता.
धावता धावता आपण किती किलोमीटर अंतरावर आलो याचं भान हरपून जात होतं.अंधारलेल्या रस्त्यावर डोळ्यासमोर फक्त स्वप्नांना बळ देण्यासाठी,यशाला कवेत घेण्यासाठी न खचता न डगमगता खंबीरपणे यशाचा पाठलाग करत सुरेश येरमुले अंधारात धावत होता.धावता धावता सुर्यदेव उजाडयला लागला आणि रस्त्यावर वृत्त पेपरच्या कागदाचा तुकडा नजरेस पडला.म्हणून सुरेशनी तो कागद उचलून वाचूलागला त्यावर छापले होते की वाशिम जिल्ह्यात पोलीस भरती आहे.तो शब्द ती तारीख मनाला स्पर्श करून गेली आणि पुन्हा सुरेश पेटून उठला आता थांबायचं नायं, उसळत्या रक्ताचं पाणी पाणी करत सुरेश बेफाम धावत धावत वाशिम जिल्ह्यात पोलीस कवायत मैदानावर पोहोचलाय आणि हजारो मुलांच्या लाईन मध्ये निर्णायक वळणावर येऊन उभा राहिला.त्यामुळे मनात उर्जा निर्माण झाली आता जर थांबलो तर आयुष्यात कायमचं थांबावं लागेल आई वडिलांच्या नशिबी कायमची दरिद्री राहील.असे मनात शेकडो विचारांनी ग्रासले होते तेव्हा पण हजारो विद्यार्थ्यांच्या पुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून परत जावं असं वाटतं होतं पण डोळ्यासमोर दिसत होता तो संसाराचा अंधार आता मात्र अंधारलेल्या जीवनाला कलाटणी देणारी संधी मिळाली म्हणून हजारो मुलांच्या रेस मध्ये सुरेश वादळासारखा धावत सुटला अन् अवघ्या काही सेकंदात रेसचा पल्ला गाठला आणि विजयाची माळ गळ्यात घालत पुर्ण शरीर घामाच्या पाण्यानं ओला चिंब झाला.
इकडे सुरेश पोलीस विभागात भरती झाला ही वार्ता आपल्या आई वडिलांना समजली त्यावेळी आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.स्वत:च्या कर्तुत्वावर भरती झालेल्या सुरेशनी यशाला अखेर कवेत घेतलेचं त्यामुळे सुरेश येरमुलेच्या जीवनाला वेगळं वळण मिळाले.अशा जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर घेतलेली भरारी खूप काही शिकवून जाते.संघर्षाच्या आगीत होरपळून निघालेला सुरेश येथेच न थांबता समाजात शेकडो मित्राचा गोतावळा तयार करून ज्या समाजात जन्माला आलोय त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक चळवळीमध्ये आवडीने भाग घेतात .
मित्राच्या मदतीने तरुणाईला डेव्हलप गार्ड इंडिया प्रा.ली.कंपनीचा मायेचा आधार उभा केला.महिलांनी स्व: कर्तुत्वावर उभं राहावं म्हणून आपल्या धर्मपत्नीला कंपनीचे डायरेक्टर करुन बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दील्या.आयुष्याच्या शर्यतीत तेच पुढे जातात आणि यशस्वी होतात ज्या़च्याकडे मजबूत हिंमत असते ते कोणत्याही संकटाचा सामना करुन इतरांच्या हितासाठी मायेचा आधार बनतात.ते जीवनात यशस्वी होऊन इतरांच्या सुखासाठी झिंंजतात अशा व्यक्ती तरुणाईला प्रेरणा देणारी ठरतायेत.कोरोनाच्या संकटात असंख्य तरुणाईला रोजगार प्रश्न उद्भवल्यांने आज अनेक तरुणं बेरोजगार बनलेले आहेत.यांच्या हाताला रोजगाराची संधी उपलब्ध करून मुंबईत कंपनी उभारली.
त्यामुळे सुरेश येरमुले समाजात प्रेरणादायी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे वाटतात.पोलीस विभागात कार्यरत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कर्तव्यात प्रामाणीकपणे आपली कामगिरी चोखपणे निभावून गुन्हेगारीचा बीमोड आणि सज्जनांना संपूर्ण संरक्षण देऊन सर्वच जातीधर्माच्या लोकांनी परस्परांशी सलोख्याने कसं वागावं, गुन्हेगारांमध्ये परिवर्तन होण्यासाठी पोलीस विभागात सुरेश येरमुले प्रर्यत्नशिल असतात.खाकी वर्दीच्या आतमध्ये एक अबोल माणूस दडलेला असतो.तोही भावनाशील, संवेदनशील आणि तितकाच कठोरही असतो.गुन्हेगारांना धडकी भरेल, जनसामान्यांला आधार वाटेल असा कर्तव्यनिष्ठ राहून माणूसकीच्या संवेदनशील मनातून माझ्या सारख्या अनेक मित्रांच्या सुख दुःखात मदतीला धावून मायेचा ओलावा टिकवून ठेवलाय.
सोबतच कवि मनाच दिलदार मित्राचे थोड्याच दिवसात कविता संग्रह प्रकाशित होत आहे.अशा प्रकारे "कर्तुत्वशाली योद्धा" संवेदनशील मनाचा कवी सुरेश येरमुलेच्या काटेरी प्रवासातील कर्तुत्वशाली मित्राचं कोणत्या शब्दातून वर्णन करावं ते शब्द अपुरे पडत असले तरी मोगरा, गुलाब, चंदणापरी सुगंध दरवळत राहो.आपल्या हातातून आयुष्यभर समाजसेवेसोबत देशसेवा घडतं राहो.साहेब तूमच्या कर्तव्याची लिलया हिऱ्या प्रमाणे चमकत राहो,स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी मनामनाची नाती, शतायुषी व्हा...औक्षवंत व्हा... यशवंत व्हा ... नामवंत व्हा... कीर्तीवंत व्हा... आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
संतोष अवसरमोल (पत्रकार)
घाटबोरी/ मेहकर
0 Comments