आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन !
वरुड (तालुका प्रतिनिधी) : सरकारच्या दोन वर्षांच्या कालावधीत आलेल्या कोरोना संकटातही मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा गाडा थांबला नाही आणि थांबणार नाही याची काळजी महाविकास आघाडी सरकारने घेतली असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले. मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये पाणी पुरवठा योजना, अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या बांधावर बंदिस्त नलिकेद्वारे पाणी पोहचविण्यासाठी, आरोग्य सुविधा पुराविण्यासाठी मोर्शी, वरुड, शेघाट, येथील रुग्णालय, ऑक्सिजन प्लांट, ॲम्बुलन्स, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, आणि रस्ते विकासकामांसाठी बाराशे कोटी रुपयांचा नीधी दोन वर्षांच्या काळामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी उपलब्ध करून दिला आहे.
विकासाच्या दृष्टीने मोर्शी वरुड तालुक्यामध्ये आतापर्यंत बाराशे कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे मोर्शी वरुड तालुक्याच्या विकासाला गती प्राप्त झाली असून विकास कामांची ही मालिका मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये अशीच सुरू राहणार आहे. अशी ग्वाही विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. वरुड तालुक्यातील लोणी येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
वरुड तालुक्यातील ग्राम लोणी येथे 13 कोटी 50 लक्ष रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे करिता विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पाडला. यामध्ये पिंपळखुटा ते करजगाव ते लोणी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करणे व लोणी गावातील डिव्हाडर रस्त्यासह व पुलाचे बांधकाम करणे आणि धवलगिरी नदीवरील पुलाचे बांधकाम करिता 06 कोटी रुपये, हिवरखेड ते लोणी ते हातुर्णा रस्त्याचे डांबरीकरण करणे करिता 4 कोटी 50 लक्ष रुपये, लोणी ते हातुर्णा मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व चार पुलाचे बांधकाम करणे करिता 3 कोटी रुपये, या तिन्ही कामांकरिता १३ कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर करून दिला असून या कार्यक्रमा करीता आमदार देवेंद्र भुयार, विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी, माजी सभापती कमलाकर पावडे, सरपंच सौ. अश्विनीताई दवंडे, उपसरपंच रवीभाऊ तिखे, जि. प. सदस्य राजेंद्र बहुरूपी, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, प्रदीपभाऊ क्षिरसागर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस वरुड तालुका अध्यक्ष बाळु पाटील कोहळे,
राष्ट्रवादी काँग्रेस मोर्शी तालुकाध्यक्ष बंडू जिचकार, माजी सभापती निलेश मगर्दे, राष्ट्रवादी काँग्रेस मोर्शी तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, अरुण खेरडे, सरपंच मंगरुळी राजेंद्र घोरमाडे, सरपंच मालखेड विजय वडस्कर, सरपंच काचूर्णा प्रवीण गेडाम, हिवरखेड येथील सरपंच विजय पाचारे, संजूभाऊ कानुगो, सुमित निंभोरकर, विक्की बडघे, प्रकाश सनेसर, राष्ट्रवादी काँग्रेस वरुड तालुका युवक अध्यक्ष हर्षल गलबले, तुषार देशमुख, स्वप्निल आजनकर, वसंतराव बारस्कर, सुरेंद्रजी ठाकरे, वासुदेवराव पोहरकर, मनोज गुल्हाने, जितेन शाह, राहुल बरडे, बंटी धरमठोक, महेंद्र देशमुख, सतिश पाटणकर, राहुल महल्ले, राजेश ठाकरे, इब्राहिम कुरेशी, मनोहरराव खेरडे, सुधाकरराव बेले, संजयजी डफरे, गौरव गणोरकर, राजु सिरस्कर, प्रताप वानखडे, सचिन सावरकर, रोशन माटे, गाजनन वानखडे, शुभम तिडके, तसेच ग्राम लोणी, काचूर्णा, हातुर्णा, करजगाव, मांगरुळी, पिंपळखुटा, हिवरखेड या गावातील ग्रा.पं. सदस्य,पदाधिकारी,गावकरी सहकारी मित्र,कार्यकर्ता युवक मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता जेष्ठ समाजसेवक कै.अतुल क्षिरसागर यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली.
0 Comments