ग्रामीण भागात गुणवत्तेची अजिबातही कमी नाही. फक्त योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे, असे म्हणत वडनेर गंगाई गावाची ओळख 'कलेक्टरचे गाव' अशी करण्यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पत्रकार शुभम बायस्कार यांनी केले. पुढल्या दहा वर्षाच्या काळात किमान दहा कलेक्टर इथून तयार व्हावे, असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेली मदत आणि मार्गदर्शन आपण उपलब्ध करून देण्याची ही ग्वाही त्यांनी दिली.
दर्यापुर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील जिल्हा परिषदेच्या उत्तर बुनियादी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल विद्यार्थ्यांचा शाळेत गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
होता. दरम्यान, विद्यार्थ्यांशी शुभम बायस्कार हे बोलत होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा म्हशितकर, माला डोईफोडे, शिक्षिका शारदा गावंडे, सुशिला वानखडे, माया मामनकर, शिक्षक प्रसाद डालके, धरमदास चव्हाण, राजाभाऊ कातडे, धीरज बैस रामदास रेठे, प्रमोद खलोकार, विशाल माहुलकर, ऋषिकेश इंगळे व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एपीजे अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आयुष्यात मार्गक्रमण करावे. त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेतल्यास वाटचाल करणे सोपे जाईल असे देखील शुभम बायस्कार यांनी कार्यक्रमादरम्यान नमूद केले. मुख्याध्यापक सुनंदा म्हशीतकर यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. तसेच सर्व उपक्रमात शाळा सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभार शिक्षक राजाभाऊ कातडे यांनी मानले.
0 Comments