कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समाज मध्यामांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात प्रतिबंध

social media


बुलडाणा : सामाजिक व जातीय सलोखा कायम राहण्यासाठी समाज माध्यमांवरून प्रसारित होणा-या आक्षेपार्ह व जनप्रक्षोभक पोस्ट तसेच समाज माध्यमातून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील व जातीवाचक तेढ निर्माण होवू नये. तसेच जातीय भावना भडकविणारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित होनू नये, याकरिता सोशल मिडीया व प्रतिबंधीत करण्यासाठी भारतीय दंड संहितेचे कलम 505,153 (A) व 116 अन्वये संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहे.

आदेशानुसार कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरून निरनिराळे धार्मिक, वंशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेष भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा, अनधिकृत माहिती समाज माध्यमाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर व दंडनिय कारवाईस पात्र राहील.

निरनिराळे धार्मिक, आषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक अशी आणि ज्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडते किंवा बिघडविणे संभाव्य असते, अशा पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर व दंडनिय कारवाईस पात्र राहील. एखादी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव अपराध करण्यास प्रवृत होईल, अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखादया भागामध्ये भिती किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होईल, त्यामुळे तसे होण्याची शक्यता असेल किया एखाद्या समुहातील व्यक्तीला दुस-या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुध्द कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश असेल, चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल, अशा पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर व दंडनिय कारवाईस पात्र राहील.

सोशल मिडीयावर जो कोणी व्यक्ती संस्था, संघटना हा  अॅडमिन म्हणून कार्यरत असेल त्यांनी त्यांचे ग्रूपवर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक पोस्ट प्रसारीत होणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी. अन्यथा सदर अॅडमिन नियमानुसार कारवाईस पात्र राहील. त्याच प्रमाणे या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा काढलेल्या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्याही व्यक्तीने, भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानन्यात येईल. सदर आदेश बुलडाणा जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता पुढील आदेशापर्यत लागू करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments